भारताचा परकीय चलन साठा $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर.


गोल्ड रिझर्व्हच्या (Gold Reserve) मूल्यातील वाढीमुळे भारताच्या परकीय चलन साठ्याने (Foreign Exchange Reserves) पुन्हा एकदा नवीन ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने दिलेल्या माहितीनुसार, 13 सप्टेंबर 2024 पर्यंत भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियनने वाढून $689.48 अब्ज झाला आहे. हा गेल्या आठवड्यात $689.23 अब्ज होता.

Advertisement

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज, 20 सप्टेंबर 2024 रोजी परकीय चलनाच्या साठ्याचा डेटा जारी केला आहे. या आकडेवारीनुसार परकीय चलन साठा 223 मिलियन डॉलर्सने वाढून 689.45 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. मात्र, या काळात परकीय चलन संपत्तीत घट झाली आहे. विदेशी चलन संपत्ती $515 मिलियनने घसरुन $603.62 अब्जवर आली आहे. आरबीआयच्या सोन्याच्या साठ्यातही मोठी झेप झाली असून, हा 899 मिलियन डॉलर्सने वाढून 62.88 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे.
शुक्रवार 20 सप्टेंबर 2024 च्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजार सर्वकालीन उच्च पातळीवर बंद झाला आहे आणि यामुळे परकीय चलनाचा साठा सर्वकालीन उच्च पातळीवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, 2024 मध्ये आतापर्यंत भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात 66 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!