सिद्धेश्वर साखर कारखान्याची ‘ती’ मागणी फेटाळली; विमानतळाच्या जागेचा वाद पुन्हा उफाळणार


सोलापूर : सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना (Siddheshwar Sugar Factory) व होटगी रोड विमानतळ (Hotgi Road Airport) यांच्या वादात असलेल्या एक हेक्टर १७ आर जागेचा निकाल प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी विमानतळाच्या बाजूने दिला होता. या निर्णयाच्या विरोधात कारखान्याने अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांच्याकडे अपील दाखल केले होते. या अपिलावर काल सुनावणी झाली.

या जागेच्या निर्णय स्थगिती किंवा जैसे थे ठेवण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी कारखान्याने केली होती. ही मागणी आजच्या सुनावणीत फेटाळली आहे. या प्रकरणाची सुनावणी होण्यापूर्वीच प्रांताधिकारी पडदुणे यांच्या आदेशाची अंमलबजावणी करत उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाने (North Solapur Tehsil Office) विमानतळाला एक हेक्टर १७ आर जागेचा ताबा विमानतळ प्राधिकरणाला दिला आहे. अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह या रजेवर होत्या. आज त्या कामावर रुजू झाल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची सुनावणी घेतली.

Advertisement

विमानतळाच्या वतीने ॲड. अखिलेश देशपांडे व कारखान्याच्या वतीने ॲड. नीलेश ठोकडे यांनी बाजू मांडली. कारखान्याचे वकील ॲड. ठोकडे म्हणाले, १९८४ पासून ही जागा कारखान्याच्या ताब्यात आहे. त्यामुळे या जागेला अतिक्रमण म्हणता येणार नाही. कारखान्याला मोजणी प्रक्रियेवर आक्षेप होता, तर त्यांनी या मोजणी विरोधात तक्रार का केली नाही?, असा सवाल अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांनी विचारला. कारखान्याने मोजणीवर कोणताही आक्षेप न घेतल्याने या प्रकरणात स्थगिती देण्याचे व आदेश जैसे थे ठेवण्यास काहीही अर्थ नसल्याने अपर जिल्हाधिकाऱ्यांनी कारखान्याची ही मागणी फेटाळून लावली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!