शिक्षक अभियोक्ता व बुद्धीमता चाचणीच्या तारखा जाहिर
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षेच्या तारखा राज्य परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. २२ फेब्रुवारी २०२३ ते तीन मार्च २०२३ या दरम्यान ऑनलाईन शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे. उमेदवारांना ८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
शिक्षक होण्यासाठी आता टीईटीऐवजी आता ‘टेट’ उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. एप्रिल ते मे या दोन महिन्यांत ३५ हजार शिक्षकांची भरती होणार आहे. या पार्श्वभूमीवर फेब्रुवारीत राज्यभरातील केंद्रांवर ‘टेट’ परीक्षा ऑनलाइन घेतली जाणार आहे. त्यासाठी अंदाजित तीन ते साडेतीन लाख तरुण-तरुणी परीक्षा देतील, असा अंदाज आहे. येत्या २२ फेब्रुवारी २०२३ ते ३ मार्च २०२३ दरम्यान ऑनलाईन अभियोग्यता चाचणी परीक्षा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत असल्याचे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अर्ज करण्याची अखेरची तारीख ८ फेब्रुवारी २०२३ अशी आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये शिक्षकांची भरती करण्यासाठी ‘पवित्र पोर्टल’ विकसित करण्यात आले आहे.