श्रीपूर येथील ब्रिमा कारखान्यात कर्मचाऱ्याने जीवन संपविले


श्रीपूर :  : श्रीपूर (ता. माळशिरस) येथील ब्रिमा सागर महाराष्ट्र डिसलरी या मद्य निर्मिती कारखान्यामध्ये कामगाराने प्लास्टिक दोरीच्या साह्याने गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना आज (दि. १९) सकाळी ८ च्या सुमारास घडली. संतोष नामदेव मोरे (वय ४८) असे मृत कामगाराचे नाव आहे. या घटनेनंतर लोकप्रतिनिधी, काही कामगार आणि नातेवाईकांनी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष मोरे हा कारखान्यात कायम सेवेत आहे. आज सकाळी आठच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे सकाळच्या सत्रात कामावर आला होता. त्याने दुसऱ्या मजल्यावरील बॉक्स तयार करण्याच्या खोलीमध्ये प्लास्टिक दोरीच्या साह्याने गळफास घेऊन जीवन संपविले.

Advertisement

संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ अटक करा

 

यावेळी संतोष मोरे यांचे नातेवाईक, परिसरातील लोकप्रतिनिधी आणि काही कामगारांनी सुरुवातीला मृतदेह खाली घेण्यासाठी विरोध केला. कारखाना प्रशासनातील अधिकारी या घटनेस जबाबदार आहेत, असा आरोप नातेवाईकांनी केला. मुख्य अधिकारी यांना तत्काळ अटक करा, त्यानंतरच मृतदेह खाली घ्या, यामुळे पोलीस, नातेवाईक आणि स्थानिकांमध्ये बराच वेळ बाचाबाची झाली. त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती

शवविच्छेदनानंतर मृतदेह कारखान्यासमोर ठेवणार

 

नातेवाईक, स्थानिक लोकप्रतिनिधीच्या आणि पोलिसांच्या मध्यस्थीने पंचनामा करून जिल्हा उप रुग्णालय अकलूज येथे शवविच्छेदनासाठी मृतदेह नेण्यात आला. परंतु, शवविच्छेदन झाल्यानंतर जोपर्यंत मुख्य अधिकारी यांना अटक होत नाही. तोपर्यंत अंत्यविधी केला जाणार नाही आणि मृतदेह कारखान्यासमोर ठेवला जाणार, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. अकलूज पोलीस स्टेशनचे एपीआय चौधरी, एएसआय बाळासाहेब पानसरे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!