अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
काही वर्षांपासून सर्वात वाईट परिस्थितीचा सामना करत असलेला अनिल अंबानी यांचा व्यवसाय आता हळूहळू पुन्हा एकदा रुळावर येऊ लागला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी वृत्त आले होते की, रिलायन्स इंफ्राने आपले अधिकांश कर्ज चुकते केले आहे. कंपनीवर असलेले बँकेचे कर्ज 3831 कोटी रुपयांनी कमी होऊन 475 कोटी रुपयांवर आले आहे. या वृत्तानंतर, रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इंफ्राच्या शेअरमध्ये सातत्याने तेजी दिसत आहे.
महत्वाचे म्हणजे, रिलायन्स इंफ्राने आपला बिझनेस वाढविण्यासाठी प्रमोटर ग्रुपच्या कंपन्यांना आणि इतर गुंतवणूकदारांना Preferential Issue च्या माध्यमाने 3,014 कोटी रुपयांचा फंड उभारण्याची मंजुरी दिल्यानंतर, या शेअर्सना आणखी बळकटी मिळाली आहे.
रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रा यांचे शेअर्स सातत्याने वधारताना दिसत आहेत. दोन्ही शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांका नजिक पोहोचले आहेत. रिलायन्स इन्फ्राचा शेअर गुरुवारी एकाच ट्रेडिंग सत्रात 20 टक्क्यांनी वधारला होता. शुक्रवारीही रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागले.
रिलायन्स पॉवरचे मार्केटकॅप 14601 कोटी रुपयांवर – शेअर्सच्या वाढीबरोबरच कंपनीच्या मार्केट कॅपमध्येही सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी रिलायन्स इन्फ्राचे मार्केट कॅप 12,230 कोटी रुपये, तर रिलायन्स पॉवरचे मार्केट कॅप 14,601 कोटी रुपयांवर पोहोचले. दोन्ही कंपन्यांचे मार्केट कॅप जवळपास 27000 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
रिलायन्स पॉवरचा शेअर 27 मार्च 2020 रोजी 1.13 रुपयांवर होता. मात्र आता या शेअरमध्ये सातत्याने वाढ दिसून येत आहे. या शेअरमध्ये त्यावेळी ज्यांनी-ज्यांनी गुंतवणूक केली असेल आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असेल, त्यांना आज केवळ चार वर्षांतच 3500 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे.